केंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीत रेकॉर्डब्रेक वाढ

पाच वर्षाचा काळ हा एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी संपत्ती वाढवण्यासाठी काही विशेष नसतो. पण आपल्या नेतेमंडळीं आणि मंत्र्यांसाठी हाच काळ चांगला असू शकतो.

Updated: Apr 10, 2014, 06:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पाच वर्षाचा काळ हा एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी संपत्ती वाढवण्यासाठी काही विशेष नसतो. पण आपल्या नेतेमंडळीं आणि मंत्र्यांसाठी हाच काळ चांगला असू शकतो. पाच वर्षाच्या काळात नेत्यांच्या संपत्ती मध्ये 200 टक्के ते 1500 टक्क्यांपर्यंत वाढते.
मनमोहन सरकारचे मंत्री हे या टक्केवारीचे उत्तम उदाहरण आहे. एकीकडे जिथे कमलनाथ यांची संपत्ती पाच वर्षात 1471 इतक्या टक्क्यांनी वाढली आहे. तर काही जणांची संपत्ती ही 300 तर काही जणांची 400 टक्क्यांनी वाढली आहे. एकूण अंदाज घेतला तर मनमोहन सरकारच्या मंत्र्यांची सरासरी संपत्ती 280 टक्क्यांनी वाढली आहे.
कमलनाथ शिवाय कपिल सिब्‍बल, सलमान खुर्शीद, अजीत सिंह और गिरिजा व्‍यास यांसारख्या आजी-माजी मंत्र्यांच्या संपत्तीत देखील वाढ झाली आहे.
(नोट: संपत्तीच वाढण्याची दोन कारणं आहेत. एक, संपत्तीची बाजारभाव वाढला आहे आणि पाच वर्षाच्या काळात घेण्यात आलेली नवीन संपत्ती.)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.