राज्यातलं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं, टक्केवारी वाढली

देशात आज पाचव्या टप्प्याचं तर राज्यातलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आहे. राज्यात सरासरी पाचपर्यंत 54 टक्के मतदान झालं आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलीय.

Updated: Apr 17, 2014, 06:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशात आज पाचव्या टप्प्याचं तर राज्यातलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आहे. राज्यात सरासरी पाचपर्यंत 54 टक्के मतदान झालं आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलीय.
लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने मतदानावर परिणाम झाला असल्याचं सांगण्यात येतंय. लातूर जिल्ह्यात दुपारी पाचनंतर अवकाळी पाऊस बरसलाय. देशभरातील 121 मतदारसंघात हे मतदान शांततेत पार पडलं.
राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी अशी आहे, शिर्डीत ५४.६० %, बारामतीत ५०.४४ %, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ५३.६३%, नांदेडात ५५.३०%, शिरुर ५३%, सांगली ५६.९१% आणि पुणे ५१.२०% मतदान झालं आहे.
या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रात 12 तर मराठवाड्यात आठ तसेच कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदान पार पडलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.