राहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 18, 2014, 09:48 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.
फेब्रुवारीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ६५ गुणांक मिळाले असून आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे ५२ गुणांक मिळवून दुसर्‍या क्रमांकावर राहिलेत तर राहुल गांधी हे ४२ गुणांक मिळाल्यानं तिसर्‍या स्थानावर फेकले गेलेत.
जानेवारी महिन्यात केजरीवाल हे ७२ गुणांक मिळवून पहिल्या क्रमांकावर आले होते तर राहुल गांधी यांनी ६४ गुणांक मिळवून नरेंद्र मोदी यांच्यावर मात करत दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी मोदी यांना ५६ गुणांक मिळाले होते. मात्र ‘गुगल’वर राहुल यांच्यापेक्षा तिपटीहून अधिक मोदी यांना ‘सर्च’ केलं जातंय.
प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, प्रियंका वढेरा, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, नवीन जिंदाल या ‘युथ ब्रिगेड’मध्ये राहुल गांधी यांनी ‘सर्च’मध्ये आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या प्रिया दत्त, काँग्रेसचे केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, दुष्यंत सिंग हे या यादीत टॉप १०च्या लिस्टमध्ये आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.