निलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर

रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 14, 2014, 07:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सावंतवाडी
रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.
काल राजीनामान दिल्यानंतर पुढील भूमिका ठरवण्यासाठी आज पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसंच जिल्हाध्यक्षांवरील कारवाईही मागे घेण्याची मागणी करण्यात आलीय.
राष्ट्रवादीचे दीपक केसरकर यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पुढची दिशा ठरवण्यासाठी आज त्यांनी एक बैठक आयोजित केली होती. सावंतवाडीच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये केसरकर आणि समर्थक कार्यकर्त्यांची ही बैठक झाली. या बैठकीच्या निमित्तानं दीपक केसरकरांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. या बैठकीला सुमारे दीड हजार कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कणकवलीत जाहीर सभेत दीपक केसरकर यांच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. त्यामुळं केसरकर शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केल्याचं बोललं जातंय. केसरकरांच्या या भूमिकेमुळं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विशेष करून कोकणात राणेंना चांगलाच धक्का बसलाय. आता शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय पाऊलं उचलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.