`जिवंतपणी कुणावरही शालेय अभ्यासक्रमात धडा नको`- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनावर आधारीत धडा शालेय पाठ्यक्रमात सामाविष्ठ करण्यात येऊ नये, असं ट्वीट करून स्पष्ट केलं आहे.

Updated: May 30, 2014, 10:17 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनावर आधारीत धडा शालेय पाठ्यक्रमात सामाविष्ठ करण्यात येऊ नये, असं ट्वीट करून स्पष्ट केलं आहे.
ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय, मी वर्तमान पत्रांमध्ये वाचतोय की, देशातील काही राज्य सरकारं माझ्या जीवनावर आधारीत धड्याचा शालेय पाठ्यक्रमात समावेश करणार आहेत.
यावर स्पष्टपणे बोलतांना मोदी म्हणाले आहेत, "मला असं वाटतं, कोणत्याही जिवंत व्यक्तीच्या जीवन कार्यावर आधारीत धडा शालेय पाठ्यक्रमात नसावा"
याचं कारण देतांना मोदी म्हणतात, "भारताच्या इतिहासात अनेक महापुरूष होऊन गेले आहेत, मुलांनी या महापुरूषांच्या जीवन कार्याचा अभ्यास करावा, यासाठी या महापुरूषांच्या जीवनावर आधारीत धडा शालेय अभ्यासक्रमात असावा", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर स्पष्ट केलं आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करणार असल्याचं म्हटलं होतं, सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचं सरकार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.