पेड न्यूज : चार लोकसभा उमेदवारांवर ठपका

पेड न्यूजप्रकरणी चार लोकसभा उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीच्या छाननीनंतर हे चार उमेदवार दोषी आढळलेत. प्रथमदर्शनी हे चौघे दोषी आहेत, अशा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2014, 11:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पेड न्यूजप्रकरणी चार लोकसभा उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीच्या छाननीनंतर हे चार उमेदवार दोषी आढळलेत. प्रथमदर्शनी हे चौघे दोषी आहेत, अशा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे.
निवडणूक आयोगाने नेमलेल्या समितीने काँग्रेसच्या तीन आणि भाजपच्या एका उमेदवारावर ठपका ठेवला आहे. यामध्ये विश्वजीत कदम, मिलिंद देवरा, संजय निरुपम हे काँग्रेसचे तर अनिल शिरोळे हे भाजपचे उमेदवार आहेत. दरम्यान, चारही उमेदवारांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
एका वृत्तपत्रात मिलिंद देवरांच्या तीन पेड न्यूज असल्याचं समितीने म्हटलं आहे. त्याचबरोबर इतर तीनही उमेदवारांनी मराठी वृत्तपत्रात पेड न्यूज दिल्याचं समितीने अहवालात नमूद केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.