....अखेर राज ठाकरेंना मैदान मिळाले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गेले काही दिवस मुंबईतील प्रचाराच्या सभेसाठी हवे असणारे मैदान यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झगडावे लागले होते. अखेर राज ठाकरे यांना सभेसाठी मैदान मिळाले आहे. उद्या म्हणजे १३ तारखेला प्रचाराच्या समारोपाची सभा जांबोरी मैदानातच होणार आहे.

Updated: Feb 12, 2012, 10:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गेले काही दिवस मुंबईतील प्रचाराच्या सभेसाठी हवे असणारे मैदान यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झगडावे लागले होते. अखेर राज ठाकरे यांना सभेसाठी मैदान मिळाले आहे. उद्या म्हणजे १३ तारखेला प्रचाराच्या समारोपाची सभा जांबोरी मैदानातच  होणार आहे. जांबोरी मैदानात सभा घ्यायला PWD नं परवानगी दिल्याचं कळले आहे. या मैदानासाठीची अनामत  रक्कम भरण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर हे मैदान मनसेला अधिकृतरित्या उपलब्ध होईल.

 

शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी नाकारल्यावर पक्षानं सुप्रीम कोर्टात जाण्याची चाचपणी केली होती. मात्र न्यायालयीन लढाईत आलेलं अपयश आणि हातात उरलेला अत्यंत कमी वेळ यामुळं राज यांनी शिवाजी पार्कचा आग्रह सोडून जांबोरी मैदानासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यापूर्वी मनसेनं शिवसेना भवन समोर राम गणेश गडकरी चौकात सभेसाठी शिवाजी पार्क पोलिसांकडं परवानगी मागितली होती. मात्र ट्रफिकच्या कारणाखाली ही परवानगी नाकारण्यात आली.

 

तसंच आयोजक शिरीष सावंत यांना नोटीसही बजावण्यात आली. सभा घेतली तर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. पोर्तुगीज चर्च परिसरात परवानगी मागणारा अर्जही मनसेनं दिला होता. मात्र आता वरळीतलं जांबोरी मैदान मनसेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  हे मैदान PWD च्या अखत्यारीत येतं.