मायावती - `बहेनजी`नाही व्हायचंय पंतप्रधान?

लोकसभा निवडणूक २०१४मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सध्या मायावती राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मुलायम सिंह यादव आणि अरविंद केजरीवाल या आपल्या विरोधकांपेक्षा कमी दिसतायेत आणि त्या प्रचार रॅलीही कमी करतायेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची रणणिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 03:07 PM IST

लोकसभा निवडणूक २०१४मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सध्या मायावती राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मुलायम सिंह यादव आणि अरविंद केजरीवाल या आपल्या विरोधकांपेक्षा कमी दिसतायेत आणि त्या प्रचार रॅलीही कमी करतायेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची रणणिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलीय.
यावेळी मायावती स्वत: लोकसभेसाठी निवडणूक लढवत नाहीयेत. मायावती मीडियासमोरही जास्त येत नाही आणि मीडियाला मनुवादी असल्याचा आरोपही त्यांनी अनेक वेळा केलाय. मायावती यांना मतदान करणार समाज मुख्य म्हणजे दलित समाज आहे. मायावतींनी उत्तर प्रदेशच्या अनेक मतदारसंघातून आपल्या उमेदवारांची नावं जवळपास १ वर्षापूर्वी जाहीर केली होती. यावरून त्यांच्या तयारीची ताकद आपल्याला कळते.
नरेंद्र मोदींना कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान होऊ देणार नाही, असं मायावतींनी अनेकदा आपल्या भाषणांमधून म्हटलंय. भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये फसलेल्या त्यांच्या बहुजन समाज पक्षानं २०१२मधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारला. तर सध्या उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींच्या नावानं खूप चर्चा सुरू आहे. सर्व्हेमध्येही हे समोर आलंय की अनेक निवडणुकांनंतर यावेळी भाजप लोकसभा निवडणुकीत चांगलं प्रदर्शन करू शकते. त्यामुळंच की काय पण मायावतीही आपल्या पंतप्रधान बनण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवत नाहीय.
२००९मध्ये लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या बहुजन समाज पक्षानं २१ जागा जिंकल्या होत्या, तेव्हा मायावती बोलल्या होत्या की त्यांचे समर्थक त्यांना पीएम बनविण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावेल. जर तिसऱ्या आघाडीचं सरकार आगामी २०१४ निवडणुकीत आलं तर पंतप्रधानपदासाठी मायावतीही एक महत्त्वाच्या उमेदवार असतील.
आपल्या कार्यकाळात मायावती अनेक कारणांनी वादग्रस्त राहिल्या. त्यात आपल्या ३१ व्या वाढदिवशी पैशांची माळ घालणं असो की नोएडा-आग्रा एक्स्प्रेस वे बनविण्यादरम्यान भट्टा-परसौल गावांत झालेली घटना असो. मायावती सतत वादग्रस्त ठरल्या. राष्ट्रीय दलित प्रेरणा स्थळी ठिकठिकाणी आपले पुतळे मायावतींनी उभारले.
२०१२मध्ये झालेल्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या पक्षाला जास्त जागा जिंकता आल्या नाही. त्यामुळं त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. नंतर उत्तर प्रदेशात २००९मध्ये समाजवादी पक्षानं अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. २००९मधील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानंतर उत्तरप्रदेशत सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून बहुजन समाज पक्ष ठरला होता आणि त्यांनी काँग्रेस सरकारला बाहेरून समर्थन दिलं.
राजकारणात येण्यापूर्वी मायावतींनी अनेक वर्ष शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्यानंतर बहुजन समाज पक्षाचे माजी अध्यक्ष कांशीराम यांनी मायावतींना राजकारणाचे धडे दिले. १९९५मध्ये त्या राज्य आणि देशातील पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री झाल्या. मायावतींनी आपल्या राजकीय करिअरची सुरूवात १९८४मध्ये कांशीराम यांनी स्थापन केलेल्या बहुजन समाज पक्षातून झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन कांशीराम यांनी दलितांच्या उत्थानासाठी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. मायावतींनी मुजफ्फरनगर जिल्ह्यातील कैराना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक प्रचाराला सुरूवात केली आणि तेव्हाच त्यांच्या नावासमोर `बहेनजी` हे विशेषण लागलं.
यानंतर १९८५मध्ये बिजनौर आणि १९८७मध्ये हरिद्वार इथून लढवलेल्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय १९८९मध्ये पहिल्यांदा बिजनौर लोकसभा मतदारसंघातून मायावती निवडणूक जिंकल्या आणि खासदार झाल्या. तेव्हा पक्ष केवळ २ ते ३ जागा लोकसभा निवडणुकीत जिंकत.
१९९४मध्ये पहिल्यांदा मायावती उत्तरप्रदेशातून राज्यसभेतील खासदार म्हणून निवडल्या गेल्या. मायावती १९९५मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख तर उत्तरप्रदेशच्या सर्वात कमी वयाच्या दलित मुख्यमंत्री बनल्या. २००७मध्ये बीएसपी पहिल्यांदा संपूर्ण बहुमतानं उत्तरप्रदेशात निवडणूका जिंकल्या आणि मायावती पुन्हा मुख्यमंत्री झाल्या.
मायावतींचा जन्म नवी दिल्लीतील श्रीमती सुचेता कृपलानी हॉस्पिटलमध्ये १५ जानेवारी १९५६ला झाला. त्यांचे आई-वडील चांभार समाजाचे आहेत. लहानपणापासून त्यांना मॅजिस्ट्रेट होण्याची इच्छा होती. मात्र ते स्वप्न न पूर्ण होता कधीही न पाहिलेलं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं... उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री होण्याचं...

इतर त