नितीश कुमारः दिल्लीचे ‘स्वप्न’

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटणाच्या बख्तियारपूरमध्ये झाला. नितीश कुमार यांच्या वडिलांचं नाव श्री कविराज राम लखन सिंह आणि आईच नाव श्रीमती परमेश्वरी देवी आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 12:45 PM IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटणाच्या बख्तियारपूरमध्ये झाला. नितीश कुमार यांच्या वडिलांचं नाव श्री कविराज राम लखन सिंह आणि आईच नाव श्रीमती परमेश्वरी देवी आहे.
नितीश कुमार यांनी बिहार कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून पदवी मिळवली. नितिश कुमार हे जनता दल-युनायटेडचे मोठे नेते आहेत. बिहारचे मुख्यमंत्री असतांना नितिश कुमार यांनी आपल्या विकासवादी कार्यक्रमातून मोठी लोकप्रियता प्राप्त केली आहे.
नितिश कुमार यांनी आपल्या शासना काळात केलेली जबाबदार कामं लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.
नितीश कुमार यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात महाविद्यालयापासून केली. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात 1974 ते 1977 दरम्यान नितीश कुमार यांनी राजकारणाचे धडे घेतले आणि आंदोलनातही सक्रीय भूमिका पार पाडली. आंदोलनातील सक्रिय भूमिकेमुळे नितिश कुमार यांना मीसा अॅक्ट खाली अटक करण्यात आली होती.
नितिश कुमार यांनी पहिल्यांदा 1985 मध्ये लोकदलच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवून बिहार विधान परिषदेत प्रवेश केला. यानंतर 1987 मध्ये नितिश कुमार राज्याच्या युवा लोक दलाचे अध्यक्ष झाले.
नितिश कुमार यांनी 1988 ते 2004 पासून राजगच्या कार्यकाळात रेल्वे मंत्रीपद भूषवलं. रेल्वे मंत्री असतांना नितिश कुमार यांनी रेल्वेची सुरक्षा आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं पावलं टाकली. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये नितिश कुमार पीएम पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. नितिश कुमार हे कृषीमंत्रीही राहिले आहेत.
नितिश कुमारने अनेक वेळा आपल्या दावेदारीचे संकेतही दिले आहेत. नितिश कुमारांनी म्हटलं आहे की, पंतप्रधानपदाशी संबंधित ज्या व्यक्तींचा अनुभव आहे, त्या पेक्षा आपला अनुभव हा जास्त आहे.
बिहारमध्ये भाजपापासून वेगळं झाल्यानंतर, जनता दल युनायटेडचं राजकीय सामर्थ्य जरा कमी झालं आहे. मात्र बिहारमध्ये मागासलेल्या समाजामध्ये आजही त्यांची पकड कायम आहे. नितिश कुमार निवडणुकीनंतर भाजप सोबत जातात, एक एकला चालो रे भूमिका ठेवतात, याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.