उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत, एनडीएच्या बैठकीतही राहणार हजर

नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार आहेत. तसंच दिल्लीत होणाऱ्या `एनडीए`च्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर आजही दिल्लीत बैठकींचा सिलसिला सुरुच आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आज राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 19, 2014, 01:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार आहेत. तसंच दिल्लीत होणाऱ्या `एनडीए`च्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर आजही दिल्लीत बैठकींचा सिलसिला सुरुच आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आज राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक आहे.
सत्तास्थापनेच्यादृष्टीनं दिल्लीत भाजपच्या घडामोडींना वेग आलाय. नरेंद्र मोदी हे दिल्लीत कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत. याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग हे सुषमा स्वराज यांची भेट घेऊन बातचीत करतील.
कालच नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला. तर लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन कॅबिनेटबाबत चर्चा केली होती. तर सीपी ठाकुर यांनीही राजनाथ सिंहांची भेट घेतलीय.
दरम्यान, उद्या 20 मेला भाजपच्या संसदीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. यात नरेंद्र मोदींच्या नावाची पंतप्रधानपदी घोषणा करण्यात येईल. त्यानंतर शपथविधीची तारीख, मंत्रीमंडळाबाबत निर्णय घेतले जातील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.