शेंगदाणे खाण्याचे १० फायदे

शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं.

Updated: Dec 15, 2015, 06:08 PM IST
शेंगदाणे खाण्याचे १० फायदे title=

मुंबई : शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं.

मुठभर शेंगदाण्यामध्ये 426 कॅलरीज, 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 17 ग्रॅम प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात.

शेंगदाणे खाण्याचे १० फायदे :

१. शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे हे पोटाचे आजार नष्ट करतात. यांच्या नियमित सेवनाने गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.
२. शेंगदाणे खोकल्यामध्ये उपयुक्त औषधीचे काम करतात. याच्या नियमित सेवनाने पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते.
३. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले मानले जाते. हे गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.
४. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-6 फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर आहेत. शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.
५. जेवण झाल्यानंतर 50 किंवा 100 ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते, अन्न पचते आणि रक्ताची कमतरता भासत नाही.
६. आठवड्यातून ५ दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो.
७. शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची मात्रा 7.4 टक्क्यांनी घटते.
८. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते.
९. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.
१०. दररोज थोडेसे शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.