नवी दिल्ली : फणफणता ताप आपल्यावर साधारणपणे रुग्णाच्या अंगावर चादर टाकतात, पंखा बंद करतात, कुलर चालू देत नाही. एसी तर बिल्कुल बंद करतात, पण डॉक्टरांचे म्हणण आहे की तापाला कमी करण्यासाठी आणि बॉडीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वाधिक फायदेशीर एसी चालू ठेवणे असते.
एसी चालू ठेवल्याने शरीराचे तापमान वाढत नाही. तसेच ताप नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे शरिरातील पाणीही कमी होत नाही. तापात डिडायड्रेशन हे एक समस्या असते. शरिरातील पाणी कमी होण्यापासून रोखले तर तापाचे इतर अवयवांवर होणारा परिणाम कमी होतो.
'नवभारत टाइम्स'ला डॉ.डी.के. दास यांनी सांगितले की, तापामध्ये शरिराला थंड ठेवण्यासाठी वरून थंड दिले पाहिजे. साधारणपणे तापामध्ये अनेक जण थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतात, पण पंखा, कूलर आणि एसी बंद करतात.
बीएलके सुपर स्पॅशलिटी हॉस्पिटलच्या मेडिसीन डिपार्टमेंटचे डॉ. आर. के. सिंगल यांनी सांगितले की, हायड्रेशन थेरेपीच्या बेसमध्ये थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जातात. त्यामुळे ताप असेल तर घरातील पंखे, कुलर किंवा एसी चालू ठेवाव्यात.
नुकसान का होत नाही
डॉ. दास यांनी सांगितले की, तापात शरिरातील पाण्यातून २४ तासात फ्ल्यूज लॉस होतो. त्याला इंसेंसेबल लॉस म्हणतात. उन्हाळ्यात हा लॉस ७५० एमएल पासून एक लीटरपर्यंत होऊ शकतो. थंडीत हे प्रमाण ५०० एमएल पर्यंत असते. एसी इसेंसेबल लॉसला कमी करतो. एसी फणफणत्या तापात बॉडीचे तापमान वर जाऊ शकत नाही. पंख्याने गरम हवा फेकली जात असेल तर पंख्याचा वापर करू नका. शरीराला थंड हवेने फायदा होतो.
लहान मुले आणि वृद्धांचे शरीर लवकर डीहायड्रेड होते. लागोपाठ उलट्या होत असेल तर आयव्ही फ्ल्युड मार्फेत लिक्विड दिले पाहिजे. तापामध्ये कमीत कमी तीन ते चार लीटर पाणी प्यायले पाहिजे. पाणी प्यायल्यानंतर लघवी झाली नाही, तर सीव्हीअर डीहायड्रेड असू शकते. डीहायड्रेशन अधिक काळ राहिल्यास किडनीवर इफेक्ट होऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.