महिलांविषयी काय म्हणतात बराक ओबामा

 बराक ओबामा यांनी दिल्लीत सिटी फोर्ट सभागृहात २ हजार विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं, या भाषणात त्यांनी महिलांविषयी आदराचे आणि सन्मानाचे उद्गार काढले, यावरून बराक ओबामा यांचा महिलांविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो.

Updated: Jan 27, 2015, 03:33 PM IST
महिलांविषयी काय म्हणतात बराक ओबामा title=

नवी दिल्ली :  बराक ओबामा यांनी दिल्लीत सिटी फोर्ट सभागृहात २ हजार विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं, या भाषणात त्यांनी महिलांविषयी आदराचे आणि सन्मानाचे उद्गार काढले, यावरून बराक ओबामा यांचा महिलांविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो.

बराक ओबामा आपल्या भाषणात म्हणाले,  भारत-अमेरिका हे देश तेव्हाच मजबूत होतील जेव्हा ते आपल्या देशातील महिलांचा सन्मान करतील.

ओबामा पुढे म्हणाले, तुम्हाला माहित आहे मिशेलच्या बाबतीत, जे तिला वाटतं ते मला ती बोलून दाखवते, आणि असं नेहमी होतं, मला दोन मुली आहेत. अमेरिकेत महिलांना संपूर्ण अधिकार देण्याचा प्रयत्न केला जातो.

भारतात घराघरात आई आणि पत्नी परिवार एक ठेवते, सरकारमध्ये काही महिला नेत्या आहेत. काही देश तेव्हाच सफल होतात, जेव्हा त्या देशातील महिला सशक्त असतात.

मला खूप आनंद झाला, जेव्हा दिल्लीत एका महिला विंग कमांडरने माझं स्वागत केलं, मानवंदना दिली. बराक ओबामा म्हणाले,  एखाद्या देशाबद्दल तेव्हाच माहित होतं, की ते आपल्या देशातील मुलींशी कसं वागतात.

विंग कमांडर पुजा ठाकूर यांनी राष्ट्रपती भवनासमोर बराक ओबामा यांना गार्ड ऑफ ऑनर दिलं जात होतं, त्या पथकाचं पुजा ठाकूर यांनी संचलन केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.