नवी दिल्ली : वजन कमी करण्यासाठी तुम्ही बरेच काही करता पण जे करायचे आहे ते करत नाहीत. अनेक असे उपाय आहेत ज्याने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता.
अध्ययनानुसार, लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर केल्यास कॅलरी कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला आणि स्वस्त उपाय आहे. यामुळे हृद्यही मजूबत होते. एका ब्रिटीश सर्व्हेनुसार, जिना चढण्यामुळे हृयाशी निगडीत अनेक आजारांचा धोका कमी होतो.
कॅलरी बर्न करण्यात फायदेशीर
नियमितपणे जिन्याचा वापर केल्यास कॅलरी बर्न होण्यात मोठे फायदेशीर ठरते. अतिरिक्त चरबी घटवण्यात तसेच वजन कमी होण्यात मदत होते.
हृद्य मजबूत होते
जिना चढताना दृद्याची गती वाढते. ही एक कार्डियो एक्सरसाईज आहे.
एक चांगला व्यायाम
सध्याच्या धावपळीच्या युगात व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही. यावेळी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर केलात तर त्या निमित्ताने व्यायामही होऊ शकतो
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.