कंबरदुखीची कारणे आणि उपाय

कंबरदुखीबद्दल अनेक समज आणि गैरसमज पसरलेले आहेत. मात्र अनेकांना वस्तुस्थिती माहीत नसते. 

Updated: Apr 6, 2015, 07:58 PM IST
कंबरदुखीची कारणे आणि उपाय title=

मुंबई : कंबरदुखीबद्दल अनेक समज आणि गैरसमज पसरलेले आहेत. मात्र अनेकांना वस्तुस्थिती माहीत नसते. 

कंबरदुखी टाळण्यासाठी पाहू या काय आहेत उपाय-

ताठ बसावे
बसतांना नेहमी ताठ बसावे, मात्र बराच वेळ ताठ बसणेही चुकीचे आहे. बराच वेळ ताठ बसल्याने कंबरेवर ताण येत असतो. खूप वेळ एकाच स्थितीत काम करू नये. 
असं करून पाहा 
जर सलग ८ ते १० तास काम करायचे असेल तर मधे-मधे जागेवरुन उठावे. कंबर सैल सोडावी. पाठीला आराम देणंही गरजेचं आहे.

जास्त वजन उचलल्याने कंबर दुखू शकते
जेव्हा तुम्ही जड सामान उचलता त्यावेळी तुम्ही ते कसे उचलता हे महत्वाचं असतं.  हाडे, स्नायू आणि हाडांच्या संबंधित इजा तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने उचलता.
असं करून पाहा 
जड सामान उचलतांना नेहमी पायांच्या पंजांवर शरिराचा भार द्यावा.  कंबर दुखत असल्यास जड सामान उचलणे टाळावे. तसेच जमिनीवरील वस्तू उचलतांना कंबरेत न वाकता, गूढघ्यांवर वाकावे. 

बेड रेस्ट घ्यावी
कंबर दुखीवर उत्तम उपाय म्हणजे आराम करणे. मात्र सारखं झोपून राहणंही कंबरदुखीला आमंत्रण ठरू शकते. 
असं करून पाहा 
कंबर दुखत असतांना आराम करा. मात्र आधार घेत मधे-मधे उठून बसावे. 

व्यायाम करू नये
कंबरदुखी जास्त असेल तर व्यायाम करणं टाळावं. डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरिपी, व्यायाम अथवा मसाज करुन घ्यावा. 
असं करून पाहा 
कंबर दुखत असतांना कंबर आणि पोटांच्या खालील अवयवांचा व्यायाम करावा. व्यायाम न केल्याने कंबरेचे स्नायू कमकुवत होतात. पोहणे, सायकल चालवणे, फिरणे हे कंबरेसाठी उत्तम व्यायाम आहेत. 

कंबर दुखीत हा उपाय करून पाहा
सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.