दोन रूपये - एका मिनिटात, `डायबेटीसची चाचणी`

डायबेटीसची चाचणी आता अगदीच सोपी होणार आहे. अवघ्या एका मिनिटात आणि केवळ दोन रुपयांत आपल्याला रक्तातील साखरेचे प्रमाण कळू शकणार आहे.

Updated: Apr 3, 2013, 11:07 AM IST

www.24taas.com, मुंबई
डायबेटीसची चाचणी आता अगदीच सोपी होणार आहे. अवघ्या एका मिनिटात आणि केवळ दोन रुपयांत आपल्याला रक्तातील साखरेचे प्रमाण कळू शकणार आहे. कमी वेळात साखरेचे प्रमाण तपासता येणार आहे. बिट्स पिलानी संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे उपकरण शोधून काढले असून, भारतीय वैद्यकीय तपासणी संस्थेकडून (आयसीएमआर) त्याला मान्यता मिळणे बाकी आहे.

आयसीएमआरचे संचालक आणि शास्त्रज्ञांनी या उपकरणामुळे साखरेचे रक्तातील प्रमाण सहज कळू शकेल, असे म्हटले आहे. येत्या डिसेंबरमध्ये हे उपकरण बाजारात येण्याची शक्यता आहे.
देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये वापरण्यात येणार असून, त्याची चाचणी झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे उपकरण विकत घेण्यासाठी अगदी कमी रक्कम द्यावी लागणार आहे.