आजी-आजोबांना आता मोतीबिंदूच्या ऑपरेशनची गरज नाही

वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी एक नवीन रसायन शोधून काढलं आहे, हे रसायन डोळ्यात टाकण्यात येणाऱ्या ड्रॉपमध्ये वापरण्यात येणार आहे, यामुळे मोतीबिंदूची अडचण दूर होणार आहे.

Updated: Nov 10, 2015, 03:39 PM IST
आजी-आजोबांना आता मोतीबिंदूच्या ऑपरेशनची गरज नाही title=

वॉशिंग्टन : वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी एक नवीन रसायन शोधून काढलं आहे, हे रसायन डोळ्यात टाकण्यात येणाऱ्या ड्रॉपमध्ये वापरण्यात येणार आहे, यामुळे मोतीबिंदूची अडचण दूर होणार आहे.

शास्त्रज्ञांच्या मते ऑपरेशनने मोतीबिंदू आरामात हटवला जाऊ शकतो, मात्र हे खर्चिक आहे, विकसनशील देशात मोतीबिंदूमुळे आंधळेपण येण्याच्या घटना घडतात.
युनिवर्सिटी ऑफ मिशीगनच्या सेंटर फॉर केमिकल्स जीनोमिक्समध्ये शास्त्रज्ञांनी हाय-थ्रोपूट डिफ्रेंशियल स्कॅनिग क्लोरोमीटर पद्धतीचा वापर केला आहे.

यात मोतीबिंदूला उलटवण्याचा एक गुण मिळाला आहे, याची मिसळण्याची क्षमता फारच कमी आहे, यामुळे याला डोळ्यात इजेक्शनने टाकावं लागतं, जेसन गेस्टवीकी आणि त्यांचा समूहाने ३२ अतिरिक्त स्टेरोलचं परीक्षण केलं आहे, यात अखेर कंपाऊंड २९ उपयुक्त आणि परिपूर्ण मिश्रण आहे, याचा वापर मोतीबिंदू वितळवणाऱ्या ड्रॉपमध्ये करता येऊ शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.