फेसवॉश घातक, अमेरिकेत 'फेसवॉश'वर बंदी

भारतात पहिल्यांदा काही वस्तुंवर बंदी टाकण्याची सुरूवात...

Updated: Feb 3, 2016, 11:08 AM IST
फेसवॉश घातक, अमेरिकेत 'फेसवॉश'वर बंदी title=

मुंबई : भारतात पहिल्यांदा काही वस्तुंवर बंदी टाकण्याची सुरूवात झाली, यात मागील वर्षात काही वस्तुंवर बंदी आणण्यात आली, ही एक चांगली सुरूवात म्हणावी लागेल, कारण यामुळेच काही कंपन्या आपल्या प्रॉडक्टचा दर्जा घसरू देणार नाहीत.

मात्र अमेरिकेत आता एक नव्या गोष्टीवर बंदीची चर्चा आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी मागील महिन्यात एका कॉस्मेटिक इंडस्ट्रीशी संबंधित एका वादावर पडदा टाकण्यासाठी, एका कायद्यावर हस्ताक्षर केले. यात कॉस्मॅटिकवरील मायक्रो बीड्सवर बंदी लावणे ही प्रमुख भूमिका होती.

मायक्रो बीडस घातक
फेसवॉश, स्क्रब्स आणि काही कॉस्मेटिक्स प्रॉडक्टस आपली स्कीन पॉलिश करतात, त्यात लहान लहान दाणे असतात, ते मायक्रो बीड्स असतात.

या मायक्रो बीड्सच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे, हे मायक्रो बीड्स पाण्यात मिसळत नाहीत, ज्यामुळे हे बीड्स समुद्र तसेच नद्या, तलाव याच्यात असतात. समुद्रातील जलचर या बीड्स खाऊन टाकतात, पण त्यांच्या शरीराला याचं मोठं नुकसान होतं, या बीड्सच्या विषामुळे समुद्रातील जलचर आणि मासे मृत् पावतात. यामुळे मासेही खाण्यासाठी योग्य नसतात.

अमेरिकेत हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर मायक्रो बीड्सला हळूहळू हटवलं जाणार आहे. अमेरिका २०१७ मध्ये याचं उत्पादन बंद करणार आहे. कॉस्मेटिक इंडस्ट्रीला अशा प्रकारच्या मायक्रो बीड्सला मुक्त करण्याची योजना आहे. भारतात ही बंदी येण्यास खूप उशीर लागेल हे निश्चित.