दातांसाठी डॉक्टर नकोत, घरगुती उपचार बेस्ट

‘हसू’ ही मानवास लाभलेली नैसर्गिक देणगी! या देणगीत पांढरे शुभ्र दातांची भर असेल तर व्यक्तिमत्व खुलते. यासाठी दातांची निगा राखणं महत्त्वाचं आहे

Updated: Oct 10, 2013, 05:36 PM IST

www.24taas.com वृत्तसंस्था, लंडन
‘हसू’ ही मानवास लाभलेली नैसर्गिक देणगी! या देणगीत पांढरे शुभ्र दातांची भर असेल तर व्यक्तिमत्व खुलते.
यासाठी दातांची निगा राखणं महत्त्वाचं आहे. दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी महागड्या दंतवैद्याची गरज नाही. रोजच्या आपल्या रूटीनमध्ये काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास दात निरोगी राहू शकतात.
लंडनच्या एका वेबसाइटने के पुरस्कार प्राप्त दंत चिकित्सकांच्या हवाल्याने दातांना आरोग्यदायी आणि निरोगी राखण्यास सामान्य घरगुती उपचार सांगितले आहेत.
-रोज दातांना ब्रशने साफ करावे.
-रोजच्या भोजनातील साखरेचे प्रमाण कमी ठेवावे.
-प्रत्येक दोन किंवा तीन महिन्यात टुथब्रश बदलावा.इलेक्ट्रिक ब्रशचा वापरही लाभकारी होऊ शकतो.
-दिवसांतून दोनदा ब्रशने दात स्वच्छ करावे. काही खाल्ल्यावर लगेच ब्रश करू नये.
-दातांची चमक आणण्यासाठी टूथपेस्टसोबतच व्हाइटनरचा उपयोग करावा.
-धूम्रपान/मद्यपान करू नये.
-दातांच्या कोणत्याही त्रासाला सहज घेऊ नये.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.