केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय

आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळतीची समस्या सामान्य झालीय. आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या केसांना काही झालं तर प्रत्येकाचाच जीव वरखाली होतो. म्हणूनच केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्यावर योग्य उपाय करून नियंत्रण मिळवता येतं.

Updated: Aug 18, 2015, 03:43 PM IST
केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय title=

मुंबई: आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळतीची समस्या सामान्य झालीय. आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या केसांना काही झालं तर प्रत्येकाचाच जीव वरखाली होतो. म्हणूनच केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्यावर योग्य उपाय करून नियंत्रण मिळवता येतं.

हीना-मोहरी तेलाचं मिश्रण फायदेशीर

केसांच्या आरोग्यासाठी 'हीना' खूप फायदेशीर आहे. यामुळं केसांचा पोत सुधारतो तसंच टाळूचंदेखील पोषण होतं. हीनामुळं केसांचं नुकसान टाळण्यास मदत होते. परिणामी केस चमकदार आणि दाट होतात.

तर  मोहरीचे तेल अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टीफंगल असल्यानं टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यास तसंच डॅन्डरफ कमी करण्यास मदत करतात. यामुळं केसगळतीची मूळ कारणंच रोखण्यात मदत होते. परिणामी केसांचं आरोग्य सुधारतं.

कसं बनवाल हे मिश्रण? 

250 ग्रॅम मोहरीचं तेल गरम करा. त्यात 60 ग्रॅम हीना (मेहंदी)ची पानं मिसळून तेल पुरेसं गरम करा. पानं चॉकलेटी रंगाची होईपर्यंत मंद आचेवर तेल गरम करा. थोड्या वेळानं  गॅस बंद करून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळा. आता हे तेलाचं मिश्रण हवाबंद डब्यात झाकून ठेवा.

कसं वापराल तेल?

या तेलाच्या मिश्रणाचा नियमित टाळूवर हलका मसाज करा. यामुळं केसगळती रोखण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मसाज केल्यानंतर डोक्याला गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल गुंडाळून ठेवावा. यामुळं तेल डोक्यात झिरपण्यास मदत होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.