लिंबाचा अधिक रस काढण्यासाठी हे करून पाहा...

 आपल्या रोजच्या जगण्यात अशा काही गोष्टी आहे, ज्या केल्याने तुम्हांला नक्की फायदा होतो. या गोष्टी आज आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहे.

Updated: Apr 24, 2015, 09:09 AM IST
लिंबाचा अधिक रस काढण्यासाठी हे करून पाहा...  title=

मुंबई :  आपल्या रोजच्या जगण्यात अशा काही गोष्टी आहे, ज्या केल्याने तुम्हांला नक्की फायदा होतो. या गोष्टी आज आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहे.

१) पांढरे कपडे अधिक शुभ्र करण्यासाठी 
पांढरे शुभ्र कपडे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला चांगली उभारी देतात. तुमचे व्यक्तिमत्व खुलून दिसते. पांढऱ्या कपड्यासाठी गरम पाण्यात पांढरे कपडे टाकून त्यात एका लिंबाची फोड टाकावी. असे १० मिनिटे भिजत ठेवावे. 

२) लिंबाचा अधिक रस काढण्यासाठी 
लिंबूचे सरबत करताना आपल्याला अधिकाधिक रस मिळावा असे वाटते. पण लिंबूतून अधिकाधिक रस कसा काढणार असा प्रश्न असतो. अशा वेळी गरम पाण्यात किमान १ तास लिंबू भिजवून ठेवावे. मग रस काढल्यास अधिक रस मिळतो. 

तसेच तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर फ्रिजमधून काढलेला लिंबू २० ते ३० सेकंद मायक्रोव्हेमध्ये ठेवावा. त्यानंतर एक मिनिटे हा लिंबू थंड करावा आणि नंतर पिळल्यास अधिकाधिक रस पडतो. 

३) कोबी उकडताना वास टाळण्यासाठी...
अनेकांना कोबीची भाजी आवडत असेल... पण कोबीची भाजी आवडत असली तरी त्याचा शिजवताना वास बिलकूल आवडत नसेल. हा वास येऊ नये यासाठी कोबी उकडवत असताना कुकरमध्ये ब्रेडचा तुकडा टाकावा. त्याने उकडलेल्या कोबीचा वास येत नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.