पुरुषांना तोंडाचा तर महिलांना स्तन-गर्भाशय कॅन्सरचा सर्वाधिक धोका

देशात पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे तर महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याचे धोका अधिक आहे, असं नुकतंच एका संशोधनातून समोर आलंय. 

Updated: Jul 31, 2015, 11:43 AM IST
पुरुषांना तोंडाचा तर महिलांना स्तन-गर्भाशय कॅन्सरचा सर्वाधिक धोका title=

नवी दिल्ली : देशात पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे तर महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याचे धोका अधिक आहे, असं नुकतंच एका संशोधनातून समोर आलंय. 

एका प्रश्नाचं उत्तर लिखित स्वरुपात देताना आरोग्य मंत्री श्रीपाद येस्सो नाईक यांनी ही माहिती दिलीय. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आलाय.

पुरूषांमध्ये कॅन्सरमुळे दगावणाऱ्या रूग्णांमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच १४.७ टक्के आहे. पुरूषांमध्ये कॅन्सरच्या रोगामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या अधिक आहे असं, आयसीएमआरच्या अहवालात म्हटलं गेलंय.

तर, गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे २४.१ टक्के महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच १६.३ टक्के स्तनाच्या कॅन्सरमुळे महिलांचे मृत्यू झाले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.