वजन वाढतंय, कसं कमी करता येईल?

वजनावर नियंत्रण ठेवल्याने आजार दूर राहतात आणि दीर्घकाळ आरोग्य लाभतं, आपल्या शरीरात जेव्हा प्रमाणपेक्षा जास्त चरबी साठते, त्यावेळी आपण लठ्ठ होतो. तुमच्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्‍के जास्त वजन झाले, म्हणजे हा लठ्‍ठपणा. लठ्‍ठपणा हृदयरोग, डायबेटीस. संधीवात, ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस अशा रोगांना निमंत्रण देतो.

Updated: Sep 16, 2014, 12:38 PM IST
वजन वाढतंय, कसं कमी करता येईल? title=

मुंबई : वजनावर नियंत्रण ठेवल्याने आजार दूर राहतात आणि दीर्घकाळ आरोग्य लाभतं, आपल्या शरीरात जेव्हा प्रमाणपेक्षा जास्त चरबी साठते, त्यावेळी आपण लठ्ठ होतो. तुमच्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्‍के जास्त वजन झाले, म्हणजे हा लठ्‍ठपणा. लठ्‍ठपणा हृदयरोग, डायबेटीस. संधीवात, ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस अशा रोगांना निमंत्रण देतो.

आपलं वजन नेमकं किती जास्त आहे, हे पाहण्यासाठी बॉडी मास इंडेक्सचा वापर करा, यात आपल्या वजनाप्रमाणे किती वजन आहे, हे तपासून पाहा.

लठ्‍ठपणा आणि गैरसमज
शरीराचे वजन वाढणे, चरबीची वाढ होणे, कमरेच्या भागातील चरबीत वाढ होते, वजन कमी करण्यासाठी औषधांचा काहीही उपयोग होत नाही. ऍम्फेटामाईन, ड्युरेटीक्स, परगेटीव्ह, अशा सारखी भूक कमी करणारी औषधे हानीकारक असतात.

आपण जाड दिसतोय, लठ्ठपणा जाणवतोय, म्हणून एकदम आहारात घट करणे हे सुध्दा सर्वसाधारणपणे योग्य नसते. अगदी आवश्यक असेल तरच आहारात एकदम घट करणे आवश्यक असते. या दरम्यान  शरीराच्या वजनावर लक्ष असू द्या.

लठ्‍ठपणावर उपाय
आहारात आवश्यक घट आणि व्यायाम या शिवाय लठ्‍ठपणा कमी करण्यासाठी पर्याय नाही. पिष्टमय पदार्थात घट, चरबी, युक्त आहारात घट, योग्य प्रमाणात प्रथिन, जीवनसत्व आणि खनिज, तंतूमय आहार तसेच भरपूर द्रवयुक्त पदार्थ असा आहार आवश्यक असतो. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात व्यायाम, जरूरी असतो. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणेच आहार आणि व्यायाम करणे योग्य. 

लठ्‍ठपणाच्या प्रमाणात वजन कमी करण्याचे प्रमाण ठरवावे. दर महिन्याला साधारणपणे २ ते ३ किलो वजन कमी करणे योग्य असते. त्यामुळे इतरही शारीरिक तोटे होत नाहीत. दिवसाच्या आवश्यकेतेपेक्षा ५०० उष्मांक कमी असणार्‍या आहाराचे सेवन केल्यास दर महिन्याला २ किलो वजन कमी होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.