हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत

आज लोकांंमध्ये ह्रदयविकार असल्याचं प्रमाण वाढलंय. योग्य आहार नसल्यामुळे, व्यसन, तणाव, चिंता अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅकचं प्रमाण आज वाढतंय. कारण हार्ट अटॅक येणार आहे याची पूर्वकल्पना आपल्याला नसते.

Updated: Dec 15, 2015, 08:41 PM IST
हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत title=

मुंबई : आज लोकांंमध्ये ह्रदयविकार असल्याचं प्रमाण वाढलंय. योग्य आहार नसल्यामुळे, व्यसन, तणाव, चिंता अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅकचं प्रमाण आज वाढतंय. कारण हार्ट अटॅक येणार आहे याची पूर्वकल्पना आपल्याला नसते.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरिरात काही हालचाली होत असतात. खालील काही गोष्टी जर तुमच्यासोबत होण्यास सुरुवात झाली तर घाबरुन जाऊ नका. लवकरात लवकर डॉक्टांचा सल्ला घ्या.

हर्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत :

१. श्वास घेतांना त्रास होणे : थकवा जाणवत असेल आणि श्वास घेतांना त्रास होत असेल तर याचा ह्रदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येण्याचा संभव असतो.

२. अति प्रमाणात घाम येणे : थोडं काम केलं तरी किंवा काहीही करत नसतांना देखील घाम येणे हे देखील हार्ट अटॅक येण्याचं संकेत असू शकतं. त्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. मळमळ किंवा उल्टी : अपचन किंवा मळमळ होण्याच्या लक्षणांना टाळू नका. पोटात दुखणे. अपचन, उल्टी येणे हे हार्ट अटॅक येण्याआधीचे संकेत असतात.

४.अवयव दुखणे : कंबर, मान, जबड्यामध्ये दुखत असेल तर तो त्रास इतर अवयवांमध्येही जाऊन हार्ट अटॅक येण्याचा संभव असतो.

५.  चिंता करणे : चिंता आणि एखाद्या गोष्टीचा खूप विचार करत बसणे. चिंतेमुळे झोप न येणे, अचानक झोपेतून उठून बसणे या सगळ्या गोष्टींमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

६. ह्रदयाचे ठोके वाढणे : पल्‍स आणि ठोके अचानक वाढल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे लगेचच डॉक्टरांकडे जावे.