सावधान! सॉफ्ट ड्रिंकमध्ये असतात हे ६ घातक केमिकल्स!

आज-काल लोकं सॉफ्ट ड्रिंक पाण्यासारखं पितात. जे आई-वडील आपल्या लहान मुलांना सुद्धा शीतपेय प्यायची परवानगी देतात त्यांनी तर ही बातमी आवर्जून वाचावी. 

Updated: Aug 1, 2016, 11:11 PM IST
सावधान! सॉफ्ट ड्रिंकमध्ये असतात हे ६ घातक केमिकल्स! title=

मुंबई: आज-काल लोकं सॉफ्ट ड्रिंक पाण्यासारखं पितात. जे आई-वडील आपल्या लहान मुलांना सुद्धा शीतपेय प्यायची परवानगी देतात त्यांनी तर ही बातमी आवर्जून वाचावी. 

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात पुढे आलंय की, शीतपेयामुळे आपली हाडं कमकुवत होतात. तसंच हृदयाचे आजार, लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे गंभीर आजार होतात. अनेकांना हे माहित आहे की, सॉफ्ट ड्रिंकमध्ये खूप जास्त प्रमाणाक साखर आणि अॅसिड असतं. पण यात सोडियम बेंझोएट आणि पारा सुद्धा मिक्स्ड केला जातो. याच्या नियमित सेवनानं अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

पाहा कोल्ड्रिंक्समध्ये कोणते घातक पदार्थ असतात

१. मर्क्युरी (पारा)- फेस निघणाऱ्या कोल्ड्रिंकमध्ये कॉर्न सिरप, अत्याधिक प्रमाणात विषाक्त धातू आणि पारा असतो.

२. सोडियम बेंझोएट - हे एक प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आहे. जे खाद्यपदार्थ खूप काळ ताजं ठेवतं. हे कोल्ड्रिंकमध्येही टाकतात... मात्र अद्याप संशोधकांनी स्पष्ट केलं नाही की हे शरीरासाठी घातक असतं की नाही. 

३. एसपारटेम - हा पदार्थ सोडा गोड बनविण्यासाठी टाकतात. याच्या जास्त मात्रेमुळं चक्कर आणि उलट्यांसारखा त्रास होतो. 

४. फॉस्फोरिक अॅसिड - सर्व प्रकारच्या सोड्यात हे अॅसिड असतं. फॉस्फोरिक अॅसिड सोड्यात तिखट चव निर्माण करण्यासाठी असतं. हे अॅसिड आपल्या हाडांमधील कॅल्शियम कमी करतं, त्यामुळं हाडं कमजोर होऊ शकतात.

५. बिसफेनोल ए - हे अधिक खतरनाक असतं कारण याचं जास्त प्रमाण आपल्या मेंदूवर परिणाम करतो. त्यामुळं बुद्धी कमजोर होते. महिलांसाठी विसफेनोल ए खूप खतरनाक असतं, कारण यामुळं थायरॉइडचा त्रास होऊ शकतो.

६. हाय फ्रॅक्टोज सिरप - हे खूप जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्समध्ये मिसळलं जातं. याच्या नियमित सेवनानं लठ्ठपणा, मधुमेह, कँसर आणि हृदयाचे आजार होवू शकतात. 

आणखी वाचा - आंब्याचे हे खास गुण आपल्याला माहितीय? आपला मधुमेह होईल गायब!

 

Source: hindi.boldsky.com

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.