घटस्फोट घेण्यापूर्वी हा विचार जरूर करा...

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे. घटस्फोट घेतल्यानंतर महिलांनाच त्रास होतो असं नाही, तर पुरूषांनाही याचा प्रचंड त्रास होतो.

Updated: Sep 2, 2015, 03:11 PM IST
घटस्फोट घेण्यापूर्वी हा विचार जरूर करा... title=

मुंबई : मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे. घटस्फोट घेतल्यानंतर महिलांनाच त्रास होतो असं नाही, तर पुरूषांनाही याचा प्रचंड त्रास होतो.

घटस्फोट घेण्यापूर्वी जरूर विचार करा....
आपलं काही चुकतंय का? आपण सुधारणा करतोय, मला वेळ द्यावा, असं मोठ्या मनाने जोडीदाराला सांगा.
आपलं नेमकं काय चुकतंय हे देखील जोडीदाराकडून जाणून घ्या.
जोडीदाराने सांगितलेले मुद्दे योग्य आहेत का? यावर विचार करा, सुधारणा करता येतील का यावर भर द्या.
मनात इगोला स्थान देऊ नका, कारण इगोचं भूत मानगुटीवर बसलं की भल्या भल्यांना संपवत.
लग्न झाल्यानंतर आपला नवरा / बायको आणि मुलं हे आपलं सर्वस्व आहे, बाहेरच्या तिसऱ्या व्यक्तीला या जगात स्थान नको 

या गोष्टींवरही लक्ष द्या
अशी तिसरी व्यक्ती ज्यामुळे आपले नवरा-बायकोत तणाव निर्माण होतोय, त्याच्याशी त्वरीत संबंध संपवा, कारण आपला नवरा किंवा बायको हेच शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहेत.
तिसरी व्यक्ती तुमचा वापर करतेय, हे कळण्यापूर्वी तुमचा संसार संपलेला असेल.
सोशल नेटवर्किंग, व्हॉटस अॅप, मेसेजिंग याचं चांगलं कम्युनिकेशन नवरा - बायकोत होऊ शकतं, तिसऱ्याशी प्रमाणापेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त संवाद नको, हा संवाद नवरा-बायकोतला संवाद हरवू शकतो, संशयास्पद वातावरण निर्माण करू शकतो.
आपल्या पत्नीशी आपण करत असलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करा, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्या. एकमेकांच्या आवडीनिवडीचा आदर एकमेकांतील प्रेम वाढवेल.
नेट, सोशल नेटवर्किंग, व्हॉटस अॅपवर वेळ घालवण्यापेक्षा आपआपसात नव नवीन विषयांवर चर्चा करा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.