खास: चमकदार दातांसाठी... समजुती, वास्तव आणि टिप्स

'जास्त गोड खाऊ नकोस रे... दात खराब होतील...' लहानपणापासून आईचं दटावणं मनावर कोरून बसलंय. रात्री गोडधोड खाल्ल्यामुळंही दात सडण्याचीच शक्यता जास्त... 

Updated: Jul 20, 2015, 05:40 PM IST
खास: चमकदार दातांसाठी... समजुती, वास्तव आणि टिप्स title=

मुंबई: 'जास्त गोड खाऊ नकोस रे... दात खराब होतील...' लहानपणापासून आईचं दटावणं मनावर कोरून बसलंय. रात्री गोडधोड खाल्ल्यामुळंही दात सडण्याचीच शक्यता जास्त... 

दिवसभर काहीना काही खात राहिल्यास हिरड्या दुखू लागतातच. त्यातच खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळं दातही खराब होतात. म्हणून योग्य प्रकारे आणि योग्य तेच खायला हवे. दातांचं रक्षण करायचं तर काहीही खाऊन चालणारच नाही. ठराविक पदार्थांमध्ये असे काही गुणधर्म आहेत की ते आहारात असतील तर दात मजबूत आणि चमकदार होतातच, पण त्यांची सेन्सिटिव्हिटीही दूर राहाते.

चुकूनही हळदीनं दात घासू नका

- म्हटलं जातं की अर्धा चमचा हळदीमध्ये पाण्याचे काही थेंब टाकून ते मिश्रण दातांवर लावल्यास दात साफ होतात. हे साफ खोटं आहे. यामुळं दात स्वच्छ होण्याऐवजी नवीनच संकट उभं राहील. पांढर्‍या स्वच्छ शर्टावर ज्या पदार्थाचे डाग पडतात तेच दातांवरही पडू शकतात. हळदीचे डाग दातांवर दिसणारच. दात चमकदार होणं दूरच, उलट ते पिवळे दिसू लागतील.

स्ट्रॉबेरीनं दात चमकू लागतात

- फक्त एक स्ट्रॉबेरी कुस्करून त्यात आपला टूथब्रश बुडवायचा. त्यानं दात साफ केल्यास ते हिर्‍यासारखे चमकू लागतात असं म्हटलं जातं. हे खरंही आहे. कारण स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रिक अॅसिड असते. दातांच्या कडा घालवून त्यांची कठोरता कमी करण्याचं काम स्ट्रॉबेरी करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिडही भरपूर प्रमाणात असतं. मात्र दात साफ करायचे झाल्यास पिकलेले स्ट्रॉबेरी घेणंच चांगलं. स्ट्रॉबेरीचं एक फळ नुसतं दातांवर घासलं तरीही दात स्वच्छ होतात.

केळ्यानं दातावरील काळे डाग जातात

- केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले पोटॅशियम, मॅग्निशियम आणि मँगनिज दातांवरील काळे डाग हटविण्यास मदत करतात असं म्हटलं जातं. हे खरंच आहे. पिकलेल्या केळ्याच्या सालीचा आतला भाग किमान दोन मिनिटं दातांवर घासल्यास तीन आठवड्यांनंतर दात चमकदार होतील. मात्र केळ्याचे साल हिरड्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं दातांची सखोल सफाई होणार नाही.

 

खोबरेल तेलाचा वापर

- दररोज सकाळी किमान २० मिनिटं खोबरेल तेलानं दात साफ करायला हवेत असं फार पूर्वीपासून आयुर्वेदाचार्य म्हणतात, असं असलं तरी तेलानं दात घासून त्यातील बॅक्टेरिया मरतील याबाबत कोणताही शास्त्रीय पुरावा मात्र आढळत नाही. तरीही खोबरेल तेल तोंडात घेऊन गुळण्या केल्यास बॅक्टेरिया काही प्रमाणात दूर होतीलही. नक्की होतीलच असं कुणीही सांगू शकणार नाही.

कांद्याचा फायदा

- कांदा आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. आहारात कांदा असेल तर शरीरातील बॅक्टेरिया नाहीसे होतात. जेवणातील कांद्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीची समस्या राहणार नाही.

 

लोणच्यामुळं दातांचा पिवळेपणा जातो

- जेवणात लोणचे असायलाच हवे. केवळ चवीसाठी म्हणूनच नव्हे तर अॅसिडीटी किंवा पोटातील गॅसची समस्या असेल तर खूप फायदा होतो. दातांना पिवळेपणापासून दूर ठेवायचं तर आहारात लोणचं असलंच पाहिजे. दातांवरील पिवळा थर लोणच्यामुळं निघून जातो.

तिळामुळं दात मजबूत 

- आहारात जास्तीतजास्त तिळाचा वापरही दातांसाठी गुणकारी ठरतो. तिळामुळं दात मजबूत होतातच. पण शिवाय दातांमधून प्लॉंक दूर करण्याचं महत्त्वाचं कामही तीळ करतात.

गावरान मेवा दातांसाठी फायद्याचा पण जपून

- काजू, बदाम, अक्रोड असा गावरान मेवा मजा म्हणून खातो. पण शरीरासाठी तो वरदान असला तरी दातांसाठी तर हा मेवा खूपच फायद्याचा आहे. मेवा खाताना तो दातांना चिकटत नाही. त्यामुळे दात खराब होण्याचा प्रश्‍नच नसतो. मात्र मेव्यातील नैसर्गिक गोडव्यामुळं दातांमधील कीड वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं मेवा जास्त खाणंही चांगलं नाही.

गरमागरम सूप, दातांसाठी चांगलं पण यापद्धतीनं

 - गरमागरम सूप चवीला छानच लागतं. पण त्यात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या मसाल्यांमुळं आणि ते गरमच खाल्ल्यामुळं दातांमधील बॅक्टेरिया मरुन जातात. मात्र जेवणानंतर तोंड स्वच्छ धुतलं नाही तर दात खराब होऊ शकतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.