'अनिद्रे'पासून दूर राहण्याचे हे काही सहज-सोपे उपाय...

तुम्ही अनिद्रा म्हणजेच 'इनसोमेनिया'चे दिर्घकाळापर्यंत शिकार ठरलात तर हा आजार तुमचं वय कमी करू शकतं. 

Updated: Dec 9, 2014, 04:45 PM IST
'अनिद्रे'पासून दूर राहण्याचे हे काही सहज-सोपे उपाय...  title=

नवी दिल्ली : तुम्ही अनिद्रा म्हणजेच 'इनसोमेनिया'चे दिर्घकाळापर्यंत शिकार ठरलात तर हा आजार तुमचं वय कमी करू शकतं. 

आपल्यापैंकी बहुतेक लोक आपली निद्रा पूर्ण करू शकत नाहीत... किंवा झोप आल्यानंतरही ते आपलं काम करत राहतात. स्वस्थ राहण्यासाठी प्रत्येकानं कमीत कमी सहा तासांची झोप पूर्ण करायला हवी. दीर्घकाळापर्यंत झोप टाळत राहिल्यास तुम्ही अनिद्रेचे शिकार ठरू शकता. 

अभ्यासानुसार, अनेक दिवसांपूर्यंत अनिद्रेचे शिकार ठरल्यास तुमच्या रक्ताच्या सूजेच्या स्तरावर वाढवू शकतो. ज्यामुळे, हृदयासंबंधीचे आजार, डायबेटीज, कँसर, डिमेंशिया, स्थूलपणा आणि ताण-तणावाल सामोरं जावं लागू शकतं. 

त्यामुळे, तुम्ही जेव्हा झोपण्यासाठी जाल तेव्हा तुमच्या आजुबाजुला शांतता असेल याची खात्र करा. जवळपास होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाला टाळा. तसंच तुमचा झोपण्याचा बिछाना मुलायम आणि कम्फर्टेबल असेल याची खात्री करून घ्या. ज्यामुळे तुम्ही आरामात झोपू शकाल.जर तुमचा बिछाना कठिण असेल तर तुम्हाला त्यावर झोपण्यास त्रास जाणवू शकतो. 

झोपताना रुममधील लाईट बंद करा. लाईट सुरु असेल तर डोळे  वारंवार उघडले जातात आणि तुम्ही झोपू शकत नाही. त्यामुळे लाईट बंद करून झोपा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.