योगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका!

अनेक जण बिझी आयुष्यात सकाळचे जॉगिंग किंवा जिमला जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही... कारण, जर तुम्ही रोज योगासनं करत असाल तर हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं.

Updated: Dec 17, 2014, 11:49 AM IST
योगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका! title=

न्यूयॉर्क : अनेक जण बिझी आयुष्यात सकाळचे जॉगिंग किंवा जिमला जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही... कारण, जर तुम्ही रोज योगासनं करत असाल तर हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं.

योगासनांची तुमचं स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी तुम्हाला खूप मदत होऊ शकते आणि मुख्य म्हणजे योगासनं हृदय विकाराचा धोका कमी करतात. योगासनांमुळे तुमचा ताणतणावदेखील दूर होण्यास मदत होते.

नेदरलॅंड आणि अमेरिकन संशोधकांच्या म्हणण्यानुसार, योगासनं ही खूप फायदेशीर आहेत त्याचबरोबर ती तितकीच साधी आणि सहज आहेत ज्यामुळे आपला हृदय विकाराचा धोका कमी होतो. 

हृदयाशी निगडीत आजारांचा धोका कमी करण्यासाठी तुम्हाला जर पारंपारिक कसरत करणं जमत नसेल तर काळजी न करता योगासनांच्या पर्यायाची निवड करा, असा सल्ला शोधकर्त्यांनी दिलाय.

रोटरडम स्थित इरेस्मस युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर आणि बोस्टनस्थित हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रोफेसर आणि मुख्य लेखक मिरियम हूनिंक यांच्या म्हणण्यानुसार, योग आपलं शरीर सशक्त बनविण्यासाठी उपयोगी ठरतात... त्याचमुळे ते रोगांचे धोके टाळण्यासाठीही उपयोगी ठरतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.