मोदी सरकारचं रेल्वे बजेट, 12 प्रमुख मुद्दे

Updated: Jul 8, 2014, 04:16 PM IST
मोदी सरकारचं रेल्वे बजेट, 12 प्रमुख मुद्दे title=

रेल्वे मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी आज लोकसबेमध्ये मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं. गौडा म्हणाले, मुंबई-अहमदाबाद मार्गावर भारतातली पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे आणि एफडीआयद्वारे रेल्वेत सुधारणेसाठी पैसे जमवल्या जाईल. 

मोदींच्या ट्रेनमध्ये प्रवास महागला 

1) रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी एफडीआयद्वारे रेल्वे व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केलीय. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी)द्वारे पैसे जमवले जातील. 
2) 2014-15 सालामध्ये पाच नव्या प्रिमियम रेल्वे गाड्य़ा सुरू केल्या जातील. तर सहा एसी एक्स्प्रेस, 27 एक्स्प्रेस आणि 8 पॅसेंजर गाड्या सुरू केल्या जातील. 
3) रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की पुढील पाच वर्षांमध्ये रेल्वेचं कामकाज कागदाविना चालवलं जाईल. सर्व प्रमुख स्टेशन्सचा आंतरराष्ट्रीय दर्जा उंचावला जाईल.  
4) मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्गावर बुलेट ट्रेन चालविली जाईल. रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की, यासाठी सर्व गरजेचा अभ्यास केला गेलाय. 
5) रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)मध्ये 17 हजार पुरुष जवानांची भरती केली जाईल. तर महिला प्रवशांची सुरक्षा लक्षात घेता आरपीएफमध्ये चार हजार महिला कॉन्स्टेबलचीही भरती केली जाईल. सोबतच रेल्वेत चालणारे मोबाईल फोनही आरपीएफ टीमला दिले जातील. 
6) मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की, यासाठी सर्व आवश्यक अभ्यास केला गेलाय. नऊ मार्गांवर 160-200 किलोमीटर प्रति तास धावणाऱ्या वेगवान सेमी-हायस्पीड ट्रेन चालवली जाईल.
7) ए-1 आणि ए श्रेणीच्या रेल्वे स्टेशन्सवर वाय-फायची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. सोबतच इंटरनेटद्वारे प्लॅटफॉर्म तिकीट आणि अनारक्षित तिकीट घेण्याची सुविधा सुरू केली जाईल. 
8) कर्मचाऱ्यांच्या हितासाठीचा निधी प्रतिव्यक्ती पाचशेहून आठशे रुपये केला गेलाय. 
9) रेल्वे मंत्र्यांनी नोकरदार प्रवाशांसाठी रेल्वेतच वर्क स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय. यासाठी प्रवाशांकडून तिकीट आकारलं जाईल. त्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाईल. 
10) रेल्वेच्या सर्व वेटिंग रूमसाठी आता ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू केली जाईल. 
11) रेल्वे स्टेशनवर साफसफाईच्या जबाबदारीली आऊटसोर्स केलं जाईल आणि पहिले 50 रेल्वे स्टेशन्सवर हे लागू केलं जाईल. 
12) रेल्वे मंत्री म्हणाले की, 2013-14मध्ये रेल्वे 1 रुपयामधील 94 पैसे रेल्वे कामावर खर्च करते. ज्याचा अर्थ असा आहे की नव्या काही सुविधांसाठी सहा टक्केच वाचतात. त्यांनी सांगितलं की रेल्वेच्या चालू योजनांसाठी पाच लाख कोटी रुपयांची गरज आहे. 

रेल्वेमंत्र्यांनी आपलं भाषण संपवताच लोकसभेत विरोधकांनी खूप गदारोळ केला. रेल्वेमंत्र्यांनी एक कविता म्हणून आपलं भाषण संपवलं. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.