भारतीय शेअर बाजारात तब्बल 30 लाख कोटींचा काळा पैसा

भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सुत्रांकडून झी मीडियाला मिळालीये.

Updated: Oct 13, 2016, 07:52 AM IST
भारतीय शेअर बाजारात तब्बल 30 लाख कोटींचा काळा पैसा title=

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सुत्रांकडून झी मीडियाला मिळालीये.

अनेक गुंतवणूकदारांनी आयकर न भरता तो पैसा वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवल्याची माहिती पुढं येतेय. त्याचबरोबर शेअर बाजारात कोट्यवधींचे व्यवहार करून इन्कम टॅक्स फाईल न करणा-या व्यक्तींची यादीदेखील आयकर विभागानं तयार केलीय. 

कुठलाही शेअर खरेदी करताना किंवा विकताना त्यावर सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स अर्थात एसटीटी भरावा लागतो. याच एसटीटी विभागाकडून आयकर विभागानं सर्व तपशील मागवला असून करबुडवेगिरी करणा-या गुंतवणूकदारांची यादी तयार करण्यात आलीय. 

अशा प्रकारे शेअर बाजारातला काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकारकडून पहिल्यांदाच होताना दिसतोय.