पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी २ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी २ जणांचा मृत्यू, या आधी देखील पाकिस्तानच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन केलं जात आहे, यात आतापर्यंत ८ सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला आहे.

Updated: Nov 1, 2016, 06:00 PM IST
पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी २ जणांचा मृत्यू title=

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी २ जणांचा मृत्यू, या आधी देखील पाकिस्तानच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन केलं जात आहे, यात आतापर्यंत ८ सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला आहे.

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानच्या अशा हल्ल्यांमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये काही ठिकाणी घबराट पसरली आहे.