अखिलेश कुमार यांच्या समर्थनात 220 आमदारांनी केल्या स्वाक्षऱ्या

समाजवादी पक्षात सध्या पक्ष चिन्हावरुन वाद सुरु आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवून कोणाला किती समर्थन आहे याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

Updated: Jan 5, 2017, 03:32 PM IST
अखिलेश कुमार यांच्या समर्थनात 220 आमदारांनी केल्या स्वाक्षऱ्या title=

लखनऊ : समाजवादी पक्षात सध्या पक्ष चिन्हावरुन वाद सुरु आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवून कोणाला किती समर्थन आहे याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समर्थक, आमदार आणि मंत्र्यांसोबत बैठक घेतली. अखिलेश यांनी समर्थकांना निवडणुकीत उतरण्यास सांगितलं असून पक्षाच्या चिन्हाबाबत ते बघून घेतील असं म्हटलं आहे. अखिलेश यांच्या समर्थनात 220 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.