उत्तर प्रदेशमध्ये उसळलेल्या दंगलीत २८ बळी

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये गेल्या दोन दिवसांत 28 जणांचे बळी गेले आहेत. आजही येथ तणावपुर्ण वातावरण असल्यान कर्फ्यू चालूच आहे.

Updated: Sep 9, 2013, 02:34 PM IST

www.24taas.com झी मीडिया, उत्तरप्रदेश
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये गेल्या दोन दिवसांत 28 जणांचे बळी गेले आहेत. आजही येथ तणावपूर्ण वातावरण असल्यान कर्फ्यू चालूच आहे.
हिंसक घटनेमुळे यूपी सरकारने कारवाई केली आहे. या दंगलीनंतर सहारनपूरचे डीआयजी डी. डी. मिश्रा आणि फुगनाचे एसएचओ ओमवीर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल. जोशी यांनी या दंगलीबाबत केंद्र सरकारला आपला अहवाल पाठवून दिला आहे. या अहवालात त्यांनी या हिंसक वृत्तीवर ताबा आण्यात सरकार अयशस्वी ठरले असल्याचे स्पष्ट केले आहे.
या घटनेसंदर्भात बीजेपीच्या चार विधानमंडळाच्या सदस्यांवरही आरोप दाखल केला आहे. यामध्ये संगीत सोम, हुकुम सिंह, भारततेंदू, सुरेश राणा आणि कॉंग्रेसचे हरेंद्र मलिक याच्यांवर आरोप दाखल झाला आहे.
रविवारपासून झालेल्या या घटनेमध्ये १४ लोकांनी आपला जीव गमावला असून आतापर्यत हा अकडा २६ वर गेला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. प्रशासन व्यवस्थेने सर्वठिकाणी चोख यंत्रणा ठेवली आहे. काही भागात फायरिंग चालू असून आतापर्यंत ५२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही गावांमध्ये धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी पेट्रोल बॉंम्बचादेखील वापर करण्यात आल्याने २०० जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.