५०० रुपयाच्या नोटा का नाही मिळत, जाणून घ्या खरं कारण

नोटबंदीनंतर देशात पैशाची मोठी खळबळ माजली आहे. तसेच एटीएममध्ये देखील २००० च्या नोटा मोठ्याप्रमाणावर मिळत आहेत. परंतु ५०० रूपयांच्या  नोटांची चणचण निर्माण झाली आहे.

Updated: Nov 26, 2016, 07:09 PM IST
 ५०० रुपयाच्या नोटा का नाही मिळत, जाणून घ्या खरं कारण title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर देशात पैशाची मोठी खळबळ माजली आहे. तसेच एटीएममध्ये देखील २००० च्या नोटा मोठ्याप्रमाणावर मिळत आहेत. परंतु ५०० रूपयांच्या  नोटांची चणचण निर्माण झाली आहे.
 
सरकारी प्रेसमध्ये ५०० च्या नोटा छापण्याच्या आधी २००० च्या नोटा छापण्यास सुरूवात केली होती. आरबीआईच्या माहितीनुसार, ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद होण्याच्या आधी २००० च्या एकूण ९,०२६ कोटीच्या नवीन नोटा सर्क्युलेशनमध्ये होत्या.
 
नोटा बदलण्याच्या पूर्ण प्रक्रियेला ७ महिन्याचा कालावधी लागणार आहे, कारण प्रिटींग प्रेसमध्ये एका महिन्याला ३०० कोटी नोटा छापण्याची क्षमता आहे, आणि सरकार २,१०० कोटीच्या नोटांच्या जागी नवीन नोटा आणणार आहे, असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले आहे.
 
२००० च्या नोटांचे मोठ्याप्रमाणावर होत असलेले आगमन आणि ५०० रूपयांच्या कमीमुळे लोकांना दैनंदिन व्यवहारात त्रास होत आहेत. तसेच दुकानदार, व्यापारी, टॅक्सी रिक्षा चालक, छोट्या नोटा जमवण्यासाठी झटत आहेत.
 
एटीएममधून अधिक प्रमाणात मिळणाऱ्या २००० च्या नोटांमुळे दुकानदार, व्यापारी, किरकोळ व्यापारी, टॅक्सी रिक्षा चालक, रेल्वे तिकीट घरांवर २००० ची नोट स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यात ५०० च्या जास्तीत जास्त नोटा सर्क्युलेशनमध्ये आणण्यासाठी प्रिटींग प्रेसमध्ये कामगार डबल शीप्टमध्ये काम करत आहेत.
 
आरबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्व प्रकियेत अनेक अडचणी येत आहेत, नोटांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना अनेक हस्तक्षेप होत आहेत, तसेच सुट्ट्या पैशासाठी एटीएम व्हॅन लुटण्याच्या घटना घडत आहेत.
 
प्रिटींग प्रेसपासून एटीएम आणि बॅंक शाखांपर्यंत नोटा घेऊन जाण्यासाठी कडक सुरक्षेची गरज आहे. परंतु कमी मनुष्यबळामुळे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नोटा पुरवठा करण्यात अडथळे येत आहेत.