मुलानं प्रेम केलं म्हणून... आईला मिळाली अशी भयंकर शिक्षा!

एका ६० वर्षीय महिलेला तिच्याच घरातून खेचत आणून सगळ्या गावासमोर निर्वस्त्र केलं गेलं... तिचा अनन्वित छळ करण्यात आला... तिच्या मुलानं केलेल्या 'प्रेमाच्या गुन्ह्याची' शिक्षा या महिलेला देण्यात आली होती. 

Updated: Apr 26, 2016, 07:19 PM IST
मुलानं प्रेम केलं म्हणून... आईला मिळाली अशी भयंकर शिक्षा! title=

लखनऊ : एका ६० वर्षीय महिलेला तिच्याच घरातून खेचत आणून सगळ्या गावासमोर निर्वस्त्र केलं गेलं... तिचा अनन्वित छळ करण्यात आला... तिच्या मुलानं केलेल्या 'प्रेमाच्या गुन्ह्याची' शिक्षा या महिलेला देण्यात आली होती. 

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या गावात हा धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना घडलीय. या महिलेचा गुन्हा इतकाच होता की ती अशा एका मुलाची आई होती, ज्यानं आपल्या प्रेमासाठी मुलीला घेऊन गावातून पलायन केलं होतं. याचीच शिक्षा तिला देण्यात आली.

शिक्षा म्हणून भर गावासमोर तिला निर्वस्त्र करण्यात आलं... इतकंच नाही तर तिच्या तोंडाला काळं फासलं गेलं... इतक्यावरच हल्लेखोरांचं मन शांत झालं नाही... त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरचीची पूड टाकली. धक्कादायक म्हणजे, यामध्ये चार महिलांचाही समावेश होता. यावेळी, सगळं गाव केवळ तमाशा पाहात होतं... 

या महिलेच्या पतीनं पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तिची यातून सुटका केली. त्यानंतर या महिलेला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तिची परिस्थिती नाजूक असल्याचं सिनियर पोलीस ऑफिसर अखिलेश चौरसिया यांनी म्हटलंय.