पाहा कसा, एका महिलेनं ६ महिन्यांमध्ये ८५ मुलांना दिला 'जन्म'!

आसामच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये लिली बेगम लस्कर नावाच्या एका नर्सने गेल्या सहा महिन्यांमध्ये ८५ मुलांना जन्माला घातलंय. एका सरकारी योजनेबद्दल जेव्हा लिलीला माहिती मिळाली तेव्हा तिला हाव सुटली आणि तिनं चक्क आपण सहा महिन्यात ८५ मुलांना जन्म दिल्याचा दावा केला. 

Updated: Sep 22, 2015, 08:07 PM IST
पाहा कसा, एका महिलेनं ६ महिन्यांमध्ये ८५ मुलांना दिला 'जन्म'! title=
प्रातिनिधिक फोटो

करीमगंज: आसामच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये लिली बेगम लस्कर नावाच्या एका नर्सने गेल्या सहा महिन्यांमध्ये ८५ मुलांना जन्माला घातलंय. एका सरकारी योजनेबद्दल जेव्हा लिलीला माहिती मिळाली तेव्हा तिला हाव सुटली आणि तिनं चक्क आपण सहा महिन्यात ८५ मुलांना जन्म दिल्याचा दावा केला. 

मात्र तिच्या खोटेपणाचा लवकरच पर्दाफाश झाला आणि तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.

घटना अशी आहे की, सुरक्षित प्रसूतीला वाव देण्यासाठी एका सरकारी योजनेनुसार प्रत्येक महिलेला जिनं आपल्या बाळंतपणासाठी ग्रामीण स्वास्थ्य केंद्राची निवड केली. तिला ५०० रुपयांचं बक्षिस देण्याचं जाहीर केलं. लस्करला या योजनेबद्दल माहिती मिळताच तिनं त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नर्स लस्करनं फाइलमध्ये लिहिलं की, या सरकारी क्लिनिकमध्ये १६० बाळंतपण झाले आणि यातील अर्ध्याअधिक प्रकरणांमध्ये तिनं आईच्या कॉलममध्ये स्वत:चं नाव लिहिलं. त्यामुळं तिच्या नावावर योजनेचे ४० हजार रुपये जमा झाले. या महिलेनं ८५ बनावट बाळंतपणं आपल्या नावावर लिहिले होते. तपासादरम्यान संपूर्ण प्रकरण पुढे आलं आणि त्यानंतर १७ सप्टेंबरला लस्करला कामावरून काढून टाकण्यात आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.