आधार कार्ड संदर्भात गुडन्यूज, हेल्पलाईन नंबरवरुन मिळवा कोणतीही तात्काळ माहिती

देशात आधार कार्डचे महत्व दिवसागणिक वाढत आहे. आधार कार्डबाबत अजुनही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे सरकारने आधार कार्डसंदर्भात सर्व काही माहिती घरबसल्या मिळण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत कोणतीही मिळू शकणार आहे.

Updated: Nov 17, 2016, 04:58 PM IST
आधार कार्ड संदर्भात गुडन्यूज, हेल्पलाईन नंबरवरुन मिळवा कोणतीही तात्काळ माहिती title=

नवी दिल्ली : देशात आधार कार्डचे महत्व दिवसागणिक वाढत आहे. आधार कार्डबाबत अजुनही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे सरकारने आधार कार्डसंदर्भात सर्व काही माहिती घरबसल्या मिळण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत कोणतीही मिळू शकणार आहे.

आधार कार्डबाबत माहिती मिळण्यासाठी 1947 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. हा नंबर चौवीस तास उपलब्ध असणार आहे. कॉल सेंटर प्रतिनिधी सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. तर रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजपर्यंत उपलब्ध असणार आहे.

यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय भूषण पांडे यांनी सांगितले टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1947 दुसऱ्यांदा सुरु करण्यात आला आहे. जेणे करुन आधार कार्डबाबत अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. हा नंबर मोबाईल तसेच लॅंडलाईनवरुन तुम्हाला करता येऊ शकेल.

तुम्हाला आधार कार्ड काढायचे असेल किंवा तुम्ही आधार कार्ड काढले असेल तर त्याची माहिती जाणून घेऊ शकता. तसेच पत्ता बदलण्याबाबत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या टोल फ्री नंबरवरुन मिळू शकणार आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेत ही माहिती सध्यातरी उपलब्ध आहे.