नोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.

Updated: Dec 23, 2016, 11:59 AM IST
नोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली. ही बंदी जाहीर केल्यानंतर आयटी विभागाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले.

आयटी विभागाने टाकलेल्या छाप्यातून तब्बल 505 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. यात 93 कोटीहून अधिक नव्या नोटांचा समावेश असल्याची माहिती आयटीच्या सूत्रांकडून देण्यात आलीये.

नोटाबंदीनंतर 21 डिसेंबरपर्यंत 3590 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळलीये. याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून मिळालीये. तसेच नोटाबंदीनंतर टाकण्यात आलेल्या छाप्याप्रकरणी 400 प्रकरणे ईडी आणि सीबीआयकडे सोपवण्यात आलीत.