अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन रद्द, सपातील फूट टळली

 अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन रद्द झालंय.. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्या घरी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.. दोघांनाही सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं.

PTI | Updated: Dec 31, 2016, 02:06 PM IST
अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन रद्द, सपातील फूट टळली title=

लखनऊ : अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांचं निलंबन रद्द झालंय.. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्या घरी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.. दोघांनाही सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं.

 मात्र 24 तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आलाय.. मुलायम यांच्या घरी झालेल्या या बैठकीला मुलायम सिंह यादव यांच्यासह अखिलेश यादव, शिवपाल यादव आणि आझम खान हेसु्द्धा उपस्थित होते. सपामध्ये ऑल इज वेल आहे असं बोललं जातंय.. या निर्णयामुळे अखिलेश यादव मुलायम सिंहांवर भारी ठरल्याचं पाहायला मिळत आहे.

अखिलेश यादव यांच्या बैठकीला पक्षाच्या २२८ पैकी तब्बल २०० पेक्षा जास्त आमदारांनी हजेरी लावली होती. बैठकीनंतर अखिलेश यादव हे मुलायम सिंग यादव यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. या बैठकीत अखिलेश व मुलायमसिंग यांच्यात ज्या मुद्यावर वाद होता त्या जागा वाटप आणि अमरसिंग यांच्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. अमरसिंग यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.