अखलाकनं स्वत:च्या बचावासाठी अखेरचा फोन केला हिंदू मित्राला

गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अखलाक या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अकलाकच्या कुटुंबियांना भेटायला राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या असतांनाच... अखलाकनं बचावासाठी अखेरचा फोन आपल्या हिंदू मित्राला केल्याचं पुढे आलंय. 

Updated: Oct 5, 2015, 10:20 AM IST
अखलाकनं स्वत:च्या बचावासाठी अखेरचा फोन केला हिंदू मित्राला title=

बिसाहदा, दादरी: गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अखलाक या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अकलाकच्या कुटुंबियांना भेटायला राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या असतांनाच... अखलाकनं बचावासाठी अखेरचा फोन आपल्या हिंदू मित्राला केल्याचं पुढे आलंय. 

आणखी वाचा - मी गोमांस खातो, ती माता नाही फक्त एक प्राणी आहे - काटजू

मनोज सिसोदिया हा अकलाकचा बालपणापासूनचा मित्र, अकलाकनं त्या रात्री मदतीसाठी मनोजला फोन केला. मनोजनं तातडीनं पोलिसांना फोन करून अकलाकच्या घरी धाव घेतली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. गावकऱ्यांच्या बेदम मारहाणीमुळं अखलाकनं आपला जीव गमावला तर त्याचा तरूण मुलगा दानिश गंभीर जखमी झाला. 

'मी रात्री घरी झोपण्याची तयारी करत होतो, तेवढ्यात मला अखलाकचा फोन आला, तो खूप घाबरलेला होता. मनोज भाई, आम्ही खूप मोठ्या संकटात आहोत, कसही करून पोलिसांना फोन कर आणि फोर्स बोलावं' असं त्यानं मला फोनवर सांगितलं. तेच त्याचे शेवटचे शब्द होते. मी पोलिसांना फोन केला आणि माझ्या मित्राचा जीव धोक्यात असल्याचं सांगितलं. त्यानंतर मी लगेच अखलाकच्या घरी धाव घेतली, पण मला त्याच्या घरी पोहोचायला काही मिनिटांचा उशीर झाला. जमावाच्या मारहाणीमुळं अखलाकचा मृत्यू झाला होता तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. मी जरा लवकर पोहोचलो असतो, तर मी माझ्या मित्राचा जीव वाचवू शकलो असतो, असं मनोज सिसोदिया म्हणाले. 

आणखी वाचा - दादरी दुर्घटना : अरविंद केजरीवाल यांना रोखलं, मोदींचे मौन का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.