सावधान! 'केएफसी'च्या फ्राइड चिकनमध्ये निकृष्ट तेलाचा वापर

'केएफसी' कंपनी फ्राईड चिकन बनवण्यासाठी अत्यंत निकृष्ट खाद्यतेलाचा वापर करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारच्या फूड सेफ्टी ऍण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन विभागानं त्या कंपनीला दोनदा नोटीस पाठवली आहे. 

PTI | Updated: Aug 10, 2015, 10:41 AM IST
सावधान! 'केएफसी'च्या फ्राइड चिकनमध्ये निकृष्ट तेलाचा वापर title=

अलाहाबाद: 'केएफसी' कंपनी फ्राईड चिकन बनवण्यासाठी अत्यंत निकृष्ट खाद्यतेलाचा वापर करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारच्या फूड सेफ्टी ऍण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन विभागानं त्या कंपनीला दोनदा नोटीस पाठवली आहे. 

या प्रकरणात महिनाभरात समाधानकारक खुलासा न केल्यास 'केएफसी'वर कायदेशीर कारवाईबरोबरच पाच लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 'केएफसी' ही फ्राईड चिकन बनवणारी आंतरराष्ट्रीय कंपनी असून तिची जगभरात शॉप्स आहेत. 

अलाहाबाद इथल्या एका शॉपमधून फूड सेफ्टी अॅण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनच्या पथकानं काही महिन्यांपूर्वी फ्राईड चिकनचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. तपासणीतून 'केएफसी' निकृष्ट खाद्यतेलाचा वापर करत असल्याचं आणि घातक द्रव्याची त्यात भेसळ करत असल्याचं आढळलं. 

तपासणीत काय आढळलं? 

- 'केएफसी' कंपनी फ्राईड चिकनसाठी खाण्यास लायक नसलेल्या दर्जाचं निकृष्ट पामोलीन ऑईल वापरते. 
- ते पामोलीन ऑईल 'ताजं' ठेवण्यासाठी त्यात 'मिरॅकल पावडर'ची भेसळ केली जाते. 
- त्या तेलात आढळलेला आणखी एक घटक ऑक्सिजनच्या संपर्कात येताच अॅसिडिक होतो. ते पचन संस्थेला अत्यंत घातक आहे. 
- 'केएफसी'कडील पामोलीन ऑईलमध्ये अॅसिडचं प्रमाण ०.५ इतकं असलं पाहिजे. पण ते प्रमाण १.६८ असल्याचं आढळलं. त्या तेलाची रॅन्सिडिटी (कुजकटपणा) टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.