अमर सिंग यांची समाजवादी पक्षात घरवापसी

अमर सिंग यांनी आज अखेर समाजवादी पक्षात घरवापसी केली. समाजवादी पक्षानं आज राज्यसभेसाठी 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात अमर सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. अमर सिंहांव्यतिरिक्त बेनी प्रसाद वर्मा, रेवती रमण सिंह, विषंभर निषाद, अरविंद प्रताप सिंह, संजय सेठ, सुखराम सिंह यादव यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे.

Updated: May 17, 2016, 11:17 PM IST
अमर सिंग यांची समाजवादी पक्षात घरवापसी title=

नवी दिल्ली : अमर सिंग यांनी आज अखेर समाजवादी पक्षात घरवापसी केली. समाजवादी पक्षानं आज राज्यसभेसाठी 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात अमर सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. अमर सिंहांव्यतिरिक्त बेनी प्रसाद वर्मा, रेवती रमण सिंह, विषंभर निषाद, अरविंद प्रताप सिंह, संजय सेठ, सुखराम सिंह यादव यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे.

2010 साली अमर सिंह यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2011 साली त्यांनी राष्ट्रीय लोक मंच नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. स्वतः अमर सिंह यांचाही पराभव झाला होता. त्यानंतर मुलायम सिंगांसोबत त्यांच्या गाठीभेठी वाढल्या होत्या.