अमरसिंग यांनी घेतली बिग बींवर तोंडसुख

राष्ट्रीय लोक दलाचे राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलंय... अमरसिंग समाजवादी पार्टीमध्ये त्यांची अमिताभ यांच्यासोबतची मैत्री सर्वश्रूत आहे. 

Updated: Mar 30, 2016, 09:54 PM IST
अमरसिंग यांनी घेतली बिग बींवर तोंडसुख title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दलाचे राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलंय... अमरसिंग समाजवादी पार्टीमध्ये त्यांची अमिताभ यांच्यासोबतची मैत्री सर्वश्रूत आहे. मात्र आता त्यांच्यात दुरावा आल्याचं स्पष्ट झालंय. बोफोर्स घोटाळ्याची फाईल EDनं पुन्हा उघडली, तर बिग बी अडचणीत येतील, असा दावाच सिंग यांनी केलाय.

 इंडिया ट्वेंटीफोर-सेव्हन या झी मीडियातल्या वाहिनीचे संपादक वासिंद्र मिश्र यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत अमर सिंग यांनी हा गौप्यस्फोट केलाय. 
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी बच्चन यांच्या नावाचा राष्ट्रपतीपदासाठी विचार करत असल्यावर मत काय, असं मिश्र यांनी विचारलं. त्यावर सिंग अमिताभ यांच्यावर चांगलेच बरसले...

 माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी बच्चन यांना चौकशीच्या फेऱ्यापासून वाचवलं होतं, असा दावाही अमर सिंगांनी केलाय...