उरी हल्ल्यानंतर संतापले लष्कर, केंद्राला पाठविला पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव

 जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे. सेनेने लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रस्तावर लष्कराने केंद्राने पाठविला आहे. 

Updated: Sep 19, 2016, 11:41 PM IST
 उरी हल्ल्यानंतर संतापले लष्कर, केंद्राला पाठविला पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव  title=

नवी दिल्ली :  जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे. सेनेने लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रस्तावर लष्कराने केंद्राने पाठविला आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार उरी हल्ल्यानंतर लष्कराने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. 

लष्करानुसार ७७८ किलोमीटर रेंजच्या एलओसीवर लिमिटेड पण सडेतोड उत्तर देण्याची योजना आखली आहे. पाकिस्तानला धडा शिकवला जावा हा यामागील उद्देश आहे. 

दहशतवादी ठिकाणांवर हल्ला...

लष्कराकडून वाढता दबाव आणि एलओसीवर सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया यामुळे यावर केंद्राला निर्णय घ्यावा लागणार आहे. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला जावा अशी लष्कराची मागणी आहे. 

अलर्ट मोडवर सेना आणि एअऱफोर्स 

हल्ल्यानंतर लष्कर आणि एअरफोर्सला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पण सरकारला लक्षात ठेवले पाहिजे की पाकिस्तावर कोणत्याही प्रकारचा हल्ल्याचे युद्धात परिवर्तन होऊ शकते.