ही आहे भारतातली सगळ्यात लहान पायलट

ज्या वयामध्ये मुलं आर्ट्स, कॉमर्स का सायन्सला जायचं हे ठरवत असतात, त्याच वयात आयशा अजीजला विमान चालवायचं लायसन्स मिळालं होतं.

Updated: May 9, 2016, 09:44 PM IST
ही आहे भारतातली सगळ्यात लहान पायलट title=

मुंबई: ज्या वयामध्ये मुलं आर्ट्स, कॉमर्स का सायन्सला जायचं हे ठरवत असतात, त्याच वयात आयशा अजीजला विमान चालवायचं लायसन्स मिळालं होतं. आयशा आज फक्त 20 वर्षांची आहे, आणि सगळ्यात लहान वयात पायलट झालेली पहिली भारतीय होण्याचं रेकॉर्डही तिच्याच नावावर आहेत. 

सुनिता विलियम्स आयडल

आयशाचे आई-वडिल काश्मीरचे आहेत त्यामुळे काश्मीरला तीचं वर्षातून दोन ते तीन वेळा विमानानं जाणं व्हायचं. याच वेळी तिचं विमानांविषयीचं कुतुहल वाढलं. तासंतास ती आकाशातल्या विमानांकडे पाहत बसायची. 

याच वेळी आयशाला नासामध्ये जायची संधी मिळाली आणि जॉन मॅकब्राईड नावाच्या वैमानिकाला भेटली. 2013-14मध्ये सुनिता विलियम्स जेव्हा भारतात आली तेव्हा तिला भेटण्याची संधीही आयशाला मिळाली. नासामधले काही अनुभव यावेळी आयशानं सुनिताला सांगितले. सुनिता विलियम्स ही माझी आयडल असल्याचं आयशा सांगते. 

शाळेमध्ये असतानाच मिळालं लायसन्स

दहावीची परीक्षा झाल्यावर लगेचच आयशानं फ्लाईंग स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली. फक्त 16 वर्षांची असताना आयशाला विमान उडवण्याचं स्टुडंट्स लायसन्स मिळालं होतं. 

आज आयशा सिंगल इंजिन cessna 152 आणि cessna 172 ही दोन विमानं अगदी सहज चालवते. आयशा फक्त पायलटच नाही तर टीव्हीवरच्या काही जाहिराती आणि मॅगझिनच्या फोटोशूटमध्येही झळकली आहे.