कोणत्याही बँक शाखेतून नोटा बदलण्याची सोय

तुम्ही कोणत्याही बँकेतून २००५ पूर्वीच्या नोटा बदलून घेऊ शकता. ही सेवा १ जानेवारी, २०१५ पर्यंत उपलब्ध असणार आहे. भारतीय रिझर्व बँकने सामान्य जनतेला मदत करण्याची बँकांना सूचना दिलीय. तसेच बँकमध्ये कितीही नोटा बदलता येतील.

Updated: Mar 17, 2014, 05:28 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्ही कोणत्याही बँकेतून २००५ पूर्वीच्या नोटा बदलून घेऊ शकता. ही सेवा १ जानेवारी, २०१५ पर्यंत उपलब्ध असणार आहे. भारतीय रिझर्व बँकने सामान्य जनतेला मदत करण्याची बँकांना सूचना दिलीय. तसेच बँकमध्ये कितीही नोटा बदलता येतील.

नोटा बदलण्याची शेवटची तारीख याआधी ३० जून पर्यंत होती आणि ५००, १००० च्या १० पेक्षा जास्त नोटा बदलायच्या असतील तर ओळखपत्र दाखवाव लागायचं. जरी तो बँकेचा ग्राहक नसला तरी कोणताही बँकमधून नोटा बदलून घेण्याची सूट देण्यात आली आहे याबाबतीत सर्व बँकाना सूचना देण्यात आली असल्याचं रिझर्व बँकने म्हटलं आहे.

बँकेने कॅश काऊंटर आणि एटीएम यांच्याद्वारे २००५ पू्र्वीच्या नोटा देऊ नयेत असे, सूचित करण्यात आलंय. तसेच सामान्य जनता २००५ पूर्वीच्या नोटा व्यवहारात वापरु शकतात. अशा नोटा वैध आहेत त्या अजून बंद केल्या नाहीत.
जनतेला २००५ पू्र्वीच्या नोटा ओळखणे सहज शक्य आहे. त्या नोटांच्यामागे वर्ष छापलेले असते. २००५ नंतरच्या नोटांमध्ये जास्त सुरक्षा ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नकली नोटाच्या होणारा प्रसार थांबेल. सामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही यांची खबरदारी बँक घेईल असे, रिझर्व बँकने म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.