बिल क्लिंटन यांनी माझा गैरफायदा उठवला: मोनिका

आमच्यातील संबंध जगजाहीर झाल्यानंतर मला आत्महत्या करावी असं वाटत होत, अशी भावना व्हाइट हाउसमधील कर्मचारी मोनिका लेविन्स्कीने व्यक्त केली आहे. अमेरीकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या सोबत माझे शारीरिक संबंध परस्परांच्या संमतीने घडले असले तरी, क्लिंटन यांनी आपला गैरफायदा उठवला, असे स्पष्ट मत मोनिकाचे आहे.

Updated: May 8, 2014, 01:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
आमच्यातील संबंध जगजाहीर झाल्यानंतर मला आत्महत्या करावी असं वाटत होत, अशी भावना व्हाइट हाउसमधील कर्मचारी मोनिका लेविन्स्कीने व्यक्त केली आहे. अमेरीकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या सोबत माझे शारीरिक संबंध परस्परांच्या संमतीने घडले असले तरी, क्लिंटन यांनी आपला गैरफायदा उठवला, असे स्पष्ट मत मोनिकाचे आहे.
बिल क्लिंटन आणि मोनिकाचे संबंध हे 1998 मध्ये फारच गाजले होते. यानंतर मोनिकाने नोकरीचा राजीनामा दिला. या प्रकरणाबाबत मोनिकाने मौन पाळले होते. पण अखेर 16 वर्षानंतर मोनिकाने एका मासिकात लेख लिहून आपले मौन सोडले आहे.
मासिकात मोनिका म्हणतेय, `जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा मी आत्महत्या करणार होते. क्लिंटन आणि मी एका प्रौढ व्यक्तींच्या नात्याने एकत्र होतो. माझ्या आणि क्लिंटन यांच्या प्रकरणात माझी पुर्ण सहमती होती. पण क्लिंटन यांनी मात्र माझा चांगलाच गैरफायदा घेतला. मला चौकशी दरम्यान सारखं आत्महत्या करावंस वाटत होत. मी आत्महत्या करणार या भितीने माझी आई सारखी माझ्या जवळ राहत असे.`
आमच्या या प्रकरणाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले, असं मोनिकाने आपल्या लेखात लिहलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.