राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षपदी ललिता कुमारमंगलम

ललिता कुमारमंगलम यांची बुधवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ललिता कुमारमंगलम या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत.

Updated: Sep 17, 2014, 05:57 PM IST
राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षपदी ललिता कुमारमंगलम title=

नवी दिल्ली : ललिता कुमारमंगलम यांची बुधवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ललिता कुमारमंगलम या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत.

महिला आयोगावर राजकीय व्यक्तींची नेमणूक करण्याला मनेका गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच विरोध दर्शविला होता. मात्र  कुमारमंगलम यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कुमारमंगलम यांच्या निवडीचं आम्ही स्वागत करतो, असे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलंय.

कुमारमंगलम यांच्या भाजपशी असलेल्या संबंधांविषयी विचारले असता गांधी म्हणाल्या, ‘मंगलम यांचा भाजपशी संबंध आहे.. मात्र त्यांनी दोनवेळा निवडणुका लढविल्या होत्या एवढेच आहे.

या निवडीबाबत माहिती देताना गांधी यांनी सांगितले की, कुमारमंगलम या मूळच्या तमिळनाडूच्या असून त्या प्रकृती नावाची एनजीओ चालवितात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.