आसाममध्ये भाजप नेत्याच्या मुलाचं अपहरण, अपहरणकर्त्यांनी पाठवला व्हिडिओ

आसाममधील तिनसुकिया जिल्हातील भाजपच्या नेत्याच्या मुलाचं उपहरण करण्यात आलं आहे. उल्फा-इंडिपेंडेंटने आयसीस सारखा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Aug 23, 2016, 01:36 PM IST
आसाममध्ये भाजप नेत्याच्या मुलाचं अपहरण, अपहरणकर्त्यांनी पाठवला व्हिडिओ title=

गुवाहाटी : आसाममधील तिनसुकिया जिल्हातील भाजपच्या नेत्याच्या मुलाचं उपहरण करण्यात आलं आहे. उल्फा-इंडिपेंडेंटने आयसीस सारखा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हा मुलगा या फोटोमध्ये हातात हत्यारं असणाऱ्या लोकांच्यामध्ये असल्याचं दिसत आहे. तो मुख्यमंत्री सर्वानंद सोनेवाल यांच्याकडे त्याच्या सूटकेसाठी विनंती करतो आहे.

हा व्हिडिओ आज स्थानिक टीव्ही वाहिनीवर प्रसारित केला गेला. भाजप नेते आणि तिनसुकिया जिल्ह्याचे उपाध्यक्ष लखेश्वर मोरन यांचा मुलगा व्हि़डिओमध्ये दिसत आहे. १ ऑगस्टला त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.

लखेश्वर मोरन यांनी अपहरणकर्त्यांना त्याच्या मुलाला सोडून देण्याची विनंती केली आहे. आमचं सरकार असं समजते की, हिंसेने काही मिळत नाही. 

पाहा व्हिडिओ